शरद पवारांनी भाजी विकली मात्र त्यांनी त्याचं भांडवल केलं नाही – संजय राऊत

शरद पवारांनी भाजी विकली मात्र त्यांनी त्याचं भांडवल केलं नाही – संजय राऊत

पुणे – सध्या राज्याच्या राजकारणात एकही दिवस असा जात नाही जेंव्हा शिवसेना भाजपचे नेते एकमेकांवर टीका किंवा कुरघोडी करत नाहीत. काल पुण्यात संजय राऊत यांनी भाजपवर आणि नरेंद मोदींवर जोरदार हल्ले चढवले. अनेकांनी चहा विकला, मात्र त्याचं भांडवल केलं नाही. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही त्यांच्या लहानपणी भाजी विकली, मात्र त्याचं त्यांनी कधीही भांडवल केलं नाही या शब्दात संजय राऊत यांनी मोदींवर निशाणा साधला.

आम्ही जे सरकारमध्ये मांडत होतो तेच नाना पटोले त्यांच्या पक्षात मांडत होते. त्यासंदर्भात त्यांनी घेतलेली भूमिका हा त्यांच्या भावनेचा उद्रेक आहे. तसेच पटोले हे विदर्भाचे सिंह ठरू शकतात, विदर्भाचे नेते म्हणून ते पुढे येऊ शकतात असंही संजय राऊत त्यावेळी म्हणालेत.

तसेच सरकार अध्यादेश काढून राम मंदिर बांधू शकतं मग ही कोर्टबाजी कशाला?  असा सवालही त्यावेळी राऊत यांनी केला.  2019 च्या निवडणुकीकरता हे सर्व होत असून निवडणुकीच्यादरम्यान पुन्हा आयोध्येत मंदिर होणार याचाच गोंधळ होईल अशी टीकाही त्यावेळी राऊत यांनी केली. गुजरात निवडणुकीबाबत बोलताना भाजपचा बालेकिल्ला ढासळत असून त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली असल्याचं ते म्हणालेत.

COMMENTS