कवितेतून  नरेंद्र मोदींवर प्रशांत भूषण यांचा हल्लाबोल !

कवितेतून  नरेंद्र मोदींवर प्रशांत भूषण यांचा हल्लाबोल !

दिल्ली – ज्येष्ठ वकील आणि आम आदमी पार्टीचे माजी नेते प्रशांत भूषण यांनी पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्यावरुन  नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. एक कविता करुन त्यांनी ती कविता ट्विट केली आहे. नरेंद्र मोदी यांच्या सहका-यामुळेच नीरव मोदी घोटाळे करु शकला असा आरोपही प्रशांत भूषण यांनी केला आहे. नरेंद्र मोदी सत्तेवर बसले आणि नीरव मोदीने कर्ज काढले. अनेक सीईओ मोदींच्या आजबाजूला असायचे तर त्यांच्या आजूबाजूला नीरव मोदी असायचे अशी टीकाही कवितेतून मोदींवर करण्यात आली आहे.

कवितेतून नरेंद्र मोदी आणि नीरव मोदी यांचे कसे जवळचे संबंध होते आणि नरेंद्र मोदी यांच्यामुळेच नीरव मोदीचा फायदा झाला. आता मात्र मोदी समर्थक हे काँग्रेसच्या नावाने बोटे मोडत असल्याची टीकाही प्रशांत भूषण यांनी केली आहे.

COMMENTS