मिशन 2019 साठी मोदी-शाहांचा मास्टर प्लान !

मिशन 2019 साठी मोदी-शाहांचा मास्टर प्लान !

नवी दिल्ली – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. काँग्रेस-भाजपनं आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांकडून देशातील प्रत्येक राज्यासाठी प्लान आखला जात आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मास्टर प्लानची आखणी केली असल्याची माहिती आहे. आगामी निवडणुकीत भाजपनं 543 जागांसाठी मेगा प्लान तयार केला असल्याची माहिती आहे.

 असा आहे मास्टर प्लान

देशात लोकसभेच्या एकूण 543 जागांसाठी भाजपचा एक प्रभारी नियुक्त केला जाणार आहे. विशेष म्हणजे ज्या मतदारसंघासाठी प्रभारींची नियुक्ती होईल, ते प्रभारी त्या लोकसभा मतदारसंघाच्या बाहेरचे असणार आहेत. याशिवाय प्रत्येक राज्यात 11 सदस्यांची एक ‘इलेक्शन टीम’ असणार असून ही टीम 13 विशिष्ट मुद्यांवर लक्ष देणार आहे.

दरम्यान 2019 ची लोकसभा निवडणूक 2014 पेक्षा मोठ्या फरकानं जिंकायची असल्याचा मोदी, शाह यांचा प्लान असल्यामुळे ‘मोदी-शहा संघटनेवर जास्त भर देत आहेत. त्यामुळे 2014 प्रमाणेच आगामी निवडणुकीतही मोदी आणि शाहांचा करिष्मा चालणार का? नाही हे मात्र निवडणुकानंतरच समजणार आहे. त्यामुळे मोदी शाहांचा हा मास्टर प्लान कितपत यशस्वी होणार हे पाहणं गरजेचं आहे.

COMMENTS