मोदी एनडीटीव्हीला मुलाखत का देत नाहीत ?

मोदी एनडीटीव्हीला मुलाखत का देत नाहीत ?

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक न्यूज चॅनल्सना मुलाखत देतात परंतु ते एनडीटीव्हीला मुलाखत देत नसल्याची जोरदार चर्चा सध्या सोशल मिडियावर सुरु आहे. याबाबत स्वतः रवीश कुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  पंतप्रधान मोदी तुम्हाला मुलाखत का देत नाहीत? असा प्रश्ना एका कार्यक्रमात रवीश कुमार यांना प्रश्न विचारला असता ‘कदाचित पंतप्रधान मोदी माझ्या प्रश्नांना घाबरतात. जेव्हा ते माझ्या समोर असतील मी त्यांचं प्रवचन ऐकत बसणार नाही. भजी कुठे-कुठे विकली जातात? कुठे 200 रूपयांना भजी मिळतात? असं काहीही मी अजिबात ऐकून घेणार नाही. मी त्यांना प्रतिप्रश्न करणारच, त्यांना प्रश्न विचारणं म्हणजे त्यांचा अनादर करणं नव्हे” असं रविश कुमार यांनी म्हटलं आहे.

सध्या परिस्थिती वेगळी असून 99 टक्के मीडियाने सध्या गुडघे टेकले आहेत. त्यामुळे जेव्हा एखादाच कोणी प्रश्न विचारतो तर त्याला मोदीविरोधी म्हटलं जातं. पण मी त्यांना विचारतोय की मोदीजी तुम्ही रवीश विरोधी का आहात? दोन वर्षांपासून तुम्ही तुमच्या पक्षाच्या प्रवक्त्यांना माझ्या कार्यक्रमात पाठवणं बंद केलं आहे. मग नक्की विरोध कोण करतंय? मी विरोध करतोय की भाजपा माझा विरोध करत आहे? भाजपाला विचारायला हवं की ते माझा तिरस्कार करतात की खरंच माझ्या प्रश्नांना घाबरतात. मला वाटतं त्यांना माझ्या प्रश्नांची उत्तरं देता येत नाहीत. 2014 पर्यंत तर मला फोन करून कार्यक्रमात बोलावलं जायचं, मग आता काय झालं ? असा सवालही रविश यांनी केला आहे.

COMMENTS