पंतप्रधान मोदींचा प्रचारातला नवा रेकॉर्ड, भारतात पहिल्यांदाच असा प्रचार करणारे पहिले पंतप्रधान

पंतप्रधान मोदींचा प्रचारातला नवा रेकॉर्ड, भारतात पहिल्यांदाच असा प्रचार करणारे पहिले पंतप्रधान

गुजरात – पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच चर्चेत असतात, त्यांची काम करण्याची शैली असो, त्यांचे विदेशातील दौरे असो वा त्यांचा कोट असो या विषयांवरुन ते अनेकवेळा चर्चेत राहिले आहेत. आतापर्यंतच्या इतिहासात असे अनेक नवीन प्रयोग करणारे ते पहिले पंतप्रधान असल्याचं बोललं जात आहे. अशातच त्यांनी मंगळवारी एक नवा प्रयोग केला आहे. जो आजपर्यंत कोणत्याच पंतप्रधानांनी केलेला नाही. मंगळवारी सकाळी त्यांनी साबरमती नदीतून पहिल्यांदाच सी-प्लेननं प्रवास आणि त्यासोबत प्रचार केला आहे.पंतप्रधान मोदींनी N181KQ या सी-प्लेनने प्रवास करुन येथील अंबाजी मंदिर आणि  जगन्नाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

गुजरातमध्ये सध्या निवडणुकीचं वातावरण जोरदार तापत आहे. 14 तारखेला दुस-या टप्प्यातील मतदान होणार आहे. या मतदानासाठी भाजप आणि काँग्रेसचा जोरदार प्रचार सुरु आहे. अशातच अहमदाबादमध्ये रोड शो साठी पोलिसांनी पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधींना रोड शोची परवानगी नाकारली होती. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचाराचा आणि प्रवासाचा नवा प्रयोग केला आहे.

भारतामध्ये पहिल्यांदाच या सी-प्लेनचा उपयोग करण्यात आला असून अशाप्रकारचा प्रवास आणि प्रचार करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. मोदींनी केलेल्या या प्रवासाची आणि प्रचाराची जोरदार चर्चा सध्या देशभरात सुरु आहे.

COMMENTS