मुंबई – राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नागपूरमध्येच होणार असून याबाबतचे आदेश राज्यापालांनी जारी केला आहे. ४ जुलैपासून नागपूरात हे पावसाळी अधिवेशन सुरु होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून घेतला जाणार होता अंतिम निर्णय परंतु शिवसेनेबरोबर बिघडलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर मागील महिनाभर ही चर्चाच होऊ शकली नाही. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा न करताच अधिवेशन नागपूरला घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान विधिमंडळाचे नागपूरमध्ये पार पडणारे हिवाळी अधिवेशन सोडले, तर इतर सर्व अधिवेशने एखादा अपवाद वगळता मुंबईतच पार पडतात. मात्र यावेळचे पावसाळी अधिवेशन नागपुरात होणरा आहे. पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेण्याविषयी सत्ताधारी पक्षाने प्रयत्न केले होते. परंतु हे अधिवेशन नागपूरमध्ये घेण्यास शिवसेनेनं विरोध दर्शवला होता.
COMMENTS