भाजपच्या निरंजन डावखरेंविरोधात शिवसेनेचा उमेदवार !

भाजपच्या निरंजन डावखरेंविरोधात शिवसेनेचा उमेदवार !

मुंबई – कोकण पदवीधर निवडणुकीच्या रिंगणात शिवसेनेने उडी घेतली असून ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांना सेनेने उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपकडून निरंजन डावखरे निवडणूक लढवणार असून राष्ट्रवादीही आव्हाड समर्थक नजिब मुल्ला यांना रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक तिरंगी होण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे या पालघर पोटनिवडणुकीनंतर आता कोकण पदवीधर निवडणुकीत शिवसेना-भाजप आमनेसामने दिसणार आहे.

दरम्यान या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीही आपला उमेदवार जाहीर करण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रवादीकडून नजिब मुल्ला यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यामुळे या निवडणुकीत तिहेरी लढत पहायला मिळणार आहे. पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून निरंजन डावखरेंनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला होता. स्थानिक राजकारणात जितेंद्र आव्हाडांमुळे डावखरे पिता पुत्र नाराज होते. त्यामुळे आता डावखरेंविरोधात जितेंद्र आव्हाड असाच सामना पहायला मिळणार असल्याचं बोललं जात आहे.

COMMENTS