जावरा – मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या ताफ्यावर अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. रतलाम जिल्ह्याती कल्लूखेड़ी गावात ही घटना घडली आहे. या हल्ल्यात एसपींसह तीन पोलीस जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. चौहान यांची मध्यप्रदेशमध्ये सद्या जनआशीर्वाद यात्रा सुरु आहे. ही यात्रा सोमवारी रात्री महिदपूर येथे आली असता त्यांच्या ताफ्यावर हा हल्ला करण्यात आला आहे.
दरम्यान या हल्ल्यात ताफ्यातील एका बसची काच फुटली असून हल्लेखोरांचा तपास पोलीस करत आहेत. तसेच हा हल्ला करुन अज्ञात हल्लेखोर हे जवळील जंगलात पळून गेले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.या हल्लेखोरांच्या तपासासाठी 250 पोलीस तैनात करण्यात आले असल्याची माहिती आहे.
दरम्यान मुख्यमंत्री चौहान यांची उजैनमधील महिदपूर येथे सोमवारी रात्री 8 वाजता सभा पार पडली. त्यानंतर ते 8.45 वाजता महिदपूर रस्त्यावरुन जात असताना अचान हल्लेखोरांनी ताफ्यावर दगडफेक सुरु केली. यावेळी पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता या हल्ल्यात तीन पोलीस जखमी झाले आहेत. तसेच या घटनेपूर्वी मुख्यमंत्र्यांना काही लोकांनी काळे झेडें दाखवले असल्याची माहिती आहे. त्यावेळी पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता या नागरिकांनी त्यांच्यावर दगडफेक केली होती. त्यानंतर जवळपास 70 नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर सोमवारी रात्रीच मुख्यमंत्र्यांच्याच ताफ्यावर अशाप्रकारे हल्ला झाल्यामुळे राज्यभरात सध्या तणावाचं वातावरण आहे.
COMMENTS