मुंबई – दक्षिण मध्य मुंबईतील शिवसेनेचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांच्या पत्नी कामिनी शेवाळे यांना एका वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2014 साली लोकसभा निवडणुकीदरम्यान शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता, त्यात पोलिस शिपाई जखमी झाले होते. या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने कामिनी शेवाळे यांना एका वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी शेवाळे यांच्यासह एकूण 17 जणांविरोधात मारहाण, हत्येचा प्रयत्न आणि जमवाबंदीची गुन्हा दाखल झाला होता. त्या प्रकरणी आता कामिनी शेवाळेंना एका वर्षाची तुरुंगावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कामिनी शेवाळेंसह 17 जणांना मुंबई सत्र न्यायालयाने तूर्तास जामीन मंजूर केला आहे.
काय आहे प्रकरण ?
कामिनी शेवाळे या शिवसेनेचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्नी असून, त्या स्वत: शिवसेनेच्या माजी नगरसेविका आहेत. 2014 साली लोकसभा निवडणुकीदरम्यान चेंबुरजवळील तुर्भे येथे पैसे वाटल्यावरुन वाद झाला होता. यावेळी मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा होता. सेना-मनसेच्या कार्यकर्त्यांच्या झटापटीत पोलिस शिपाईक विकास थोरबोले हे जखमी झाले होते. याप्रकरणी त्यांना दोषी ठरवण्यात आलं आहे.
COMMENTS