संजय काकडेंकडून जावयाची ‘रसद’ पुरविण्यास सुरुवात, लाखोंचा खासदार निधी तुळजापूरला !

संजय काकडेंकडून जावयाची ‘रसद’ पुरविण्यास सुरुवात, लाखोंचा खासदार निधी तुळजापूरला !

सोलापूर – भाजपचे खासदार संजय काकडे यांच्याकडून जावयाची रसद पुरविण्यास सुरुवात झाली आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे पुत्र रोहन यांच्या शब्दाखातर खासदार काकडे यांनी जवळपास 45 लाख रुपयांचा स्वतःचा खासदार निधी दिला आहे. तुळजापूर विधानसभा मतदारसंघासाठी मंजूर केला आहे. जावई रोहन यांचे राजकारण सोपे व्हावे, यासाठी सासऱ्यांकडून ‘रसद’ पुरविण्यास सुरुवात झाली असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

संजय काकडे यांचे जावई रोहन देशमुख यांनी 2014 मध्ये उस्मानाबाद मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढविली होती. यामध्ये त्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे आता आगामी निवडणुकीसाठी रोहन यांनी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात जोरात काम सुरू केले आहे.सोलापूरचे रहिवासी असूनही ते जास्तीत-जास्त वेळ उस्मानाबाद जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना व लोकांच्या कामांना देत असल्याचं दिसून येत आहे. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात तुळजापूर विधानसभा मतदारसंघ आहे. याठिकाणहून पूर्वी सहकारमंत्री देशमुख यांनी निवडणूक लढविली होती. यामध्येही त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर या मतदारसंघातून आता त्यांचे पुत्र रोहन यांनी तयारी सुरू केल्याचे खासदार संजय काकडे यांनी दिलेल्या निधीवरुन दिसून येत आहे.

 

COMMENTS