मराठा क्रांती मोर्चाचा मुंबईतील बंद मागे !

मराठा क्रांती मोर्चाचा मुंबईतील बंद मागे !

मुंबई – आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी आक्रमक झालेल्या मराठा क्रांती मोर्चानं आज मुंबईत बंदची हाक दिली होती. परंतु हा बंद मागे घेण्यात आला असल्याची घोषणा मराठा क्राती मोर्चाचे मुंबईतील समन्वयक विरेंद्र पवार यांनी केली आहे. मराठा समाज मुंबई करू शकते हे सिद्ध झालं असून समाजातल्या सर्व बांधवांना, भगिनींना विरेंद्र पवार यांनी धन्यवाद म्हटंल आहे. तसेच सरकारने आज आमच्या हातात दगड काठ्या दिल्या असून गेली आठवडा भर आमची मनस्थिती काय ते सांगू शकत नाही अशी भावनाही त्यांनी व्यक्त कली आहे. तसेच दोन वर्षे काम करून हे पदरात पडत असेल तर काय करायचे असा सवालही त्यांनी केला आहे. तसेच ठाणे वाशी पदाधिका-यांनाही बंद मागे घेण्याबाबत विनंती करत असून त्यांनी बंद मागे घ्यावा याबाबत त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचंही विरेंद्र पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान आज क्रांती मोर्चाने बुधवारी मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात बंदची हाक दिली होती. अनेक ठिकाणी बंदनं हिंसक वळण घेतलं होतं. काही ठिकाणी दुकानं फोडण्यात आली, रिक्षांची तोडफोड करण्यात आली, महामार्ग रोखून धरण्यात आले, पोलिसांवर दगडफेक करण्यात आली तसेच बसेसचंही नुकसान करण्यात आलं. अखेर दुपारी अडीचच्या सुमारास हा बंद मागे घेण्यात आल्याचं आयोजकांनी जाहीर केलं आहे.

COMMENTS