मुंबै बँक संचालक मंडळ बैठकीत राडा, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल !

मुंबै बँक संचालक मंडळ बैठकीत राडा, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल !

मुंबई  – मुंबै बँक संचालक मंडळ बैठकीत राडा झाला असून संचालकांचा वाद आता पोलीस ठाण्यात पोहचला आहे. शिविगाळ केल्याप्रकरणी संचालक भिकाजी पारले यांच्या विरोधात संचालिका जयश्री पांचाळ यांनी  एमआरए पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान मुंबई जिल्हा सहकार बोर्ड निवडणूक निकालाचे पडसाद या बैठकीत उमटले असल्याचं दिसून येत आहे. या निवडणुकीत शिवसेनेच्या पॅनलवर मातक करत भाजपप्रणीत पॅनलने सर्व जागा जिंकल्या होत्या.  भिकाजी पारले हे शिवसेना प्रणीत पॅनलच्या बाजूने होते. याच निवडणुकीवर या बैठकीमध्ये राडा झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

COMMENTS