राष्ट्रवादीतून भाजपात गेलेल्या ‘या’ बड्या नेत्याला धक्का !

राष्ट्रवादीतून भाजपात गेलेल्या ‘या’ बड्या नेत्याला धक्का !

मुंबई – राष्ट्रवादीतून भाजपात गेलेल्या बड्या नेत्याला धक्का बसला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारी देण्यात आली नाही. नवी मुंबईतील गणेश नाईक यांना हा धक्का बसला आहे. भाजपने आज विधानसभेसाठी पहिल्या 125 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये गणेश नाईक यांच्या जागी बेलापूर मतदारसंघातून आमदार मंदा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर करण्याता आली आहे. च्यामुळे नाईक कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर हे दोन्ही मतदार संघ भाजपला देण्यात आले आहेत. यानुसार ऐरोली मतदार संघातून गणेश नाईक यांचे पुत्र संजीव नाईक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर बेलापूर मतदार संघातून गणेश नाईक यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा होती. परंतु शेवटच्या क्षणी मंदा म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे कुटुंबातल्या इतर सदस्यांसह राष्ट्रवादीच्या 48 नगरसेवकांसोबत भाजपमध्ये गेलेल्या गणेश नाईक यांना धक्का बसला आहे.

COMMENTS