मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निरुपम यांची उचलबांगडी, यांच्या नावाची चर्चा ?

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निरुपम यांची उचलबांगडी, यांच्या नावाची चर्चा ?

मुंबई – महाराष्ट्राच्या प्रभारीपदावर मल्लिकार्जुन खर्गे यांची नियुक्ती झाल्यानंतर काँग्रेसमध्ये बदलाचे वारे वाहू लागले असल्याचं दिसत आहे. कारण मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन संजय निरुपम यांची उचलबांगडी केली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. संजय निरुपम यांच्या जागी कृपाशंकर सिंग किंवा भाई जगताप यांच्या नावाची चर्चा आहे.

दरम्यान बेहिशेबी मालमत्तेच्या आरोपातून बाहेर पडल्यानंतर कृपाशंकर सिंग यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न केले जात असल्याचं बोललं जात आहे. परंतु मुंबईत मराठी अध्यक्ष देण्यास काँग्रेसमधील एक गट आग्रही असल्याचं बोललं आहे. त्यामुळे भाई जगताप यांच्याकडे मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपद दिलं जाऊ शकतं अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या दोघांपैकी कोणाला मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपद मिळणार याकडे लक्ष लागलं आहे.

 

COMMENTS