मुंबईत काँग्रेसची तातडीची बैठक, महत्त्वाच्या विषयावर होणार चर्चा !

मुंबईत काँग्रेसची तातडीची बैठक, महत्त्वाच्या विषयावर होणार चर्चा !

मुंबई – मुंबईत आज काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी बैठक बोलावली आहे. टिळक भवन इथे ही बैठक पार पडणार असून या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे यांच्यासह राज्यातील ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.
या बैठकीत राज्यातील सध्याच्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली जाणार आहे. कोल्हापूर आणि सांगलीमधील पूरग्रस्तांच्या मदतीबाबत ते मुख्यमंत्र्यांचीही भेट घेणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीबाबतही चर्चा केली जाणार असल्याची माहिती आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीसोबत वंचित बहुजन विकास आघाडीला घेण्याबाबत चर्चा केली जाणार आहे. यापूर्वी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आणि माणिकराव ठाकरे यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. परंतु या भेटीनंतरही प्रकाश आंबेडकर एकला चलोच्या भूमिकेत असल्याचं दिसत आहेत. परंतु तरीही त्यांना सोबत घेण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीकडून प्रयत्न केले जाणार आहेत. त्यामुळे याबाबत आजच्या बैठकीत काय निर्णय घेतला जाणार हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS