त्यामुळे मुंबईतील काँग्रेसच्या ‘या’ आमदाराचा शिवसेना प्रवेश रखडला ?

त्यामुळे मुंबईतील काँग्रेसच्या ‘या’ आमदाराचा शिवसेना प्रवेश रखडला ?

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणखी एक काँग्रेसचे आमदार शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा आहे. मुंबईतील मालाड पश्चिमचे काँग्रेस आमदार अस्लम शेख शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. परंतु मालाड पश्चिम हा विधानसभा मतदारसंघ युतीमध्ये भाजपच्या वाट्याला येतो. त्यामुळे शिवसेनेला हा मतदारसंघ सोडण्यास भाजपच्या स्थानिक नेत्यांनी विरोध केला आहे. त्यामुळे आमदार अस्लम शेख यांचा शिवसेना प्रवेश रखडला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आमदार अस्लम शेख

दरम्यान 2014च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना व भाजपा युती शेवटच्या क्षणाला तुटली होती. यावेळी आमदार अस्लम शेख यांनी भाजपाचे उमेदवार व माजी उपमहापौर डॉ. राम बारोट यांचा अवघ्या 2200 मतांनी पराभव केला होता. त्यामुळे आता 2019च्या विधानसभा निवडणुकीत युतीत ही जागा शिवसेनेला हवी आहे. परंतु डॉ. राम बारोट यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी हा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यास विरोध केला आहे. त्यामुळे अस्लम शेख यांनी सध्या तरी आपला शिवसेना प्रवेश लांबणीवर ढकलला असल्याची माहिती आहे.

COMMENTS