रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक !

रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक !

मुंबई – काही तांत्रिक कामांमुळे रविवारी ३१ डिसेंबररोजी मध्य, पश्चिम आणि हार्बर या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या तिन्ही मार्गावरील मेगाब्लॉकबाबत रेल्वे प्रशासनानं दिलेली माहिती खालीलप्रमाणे आहे.

मध्ये रेल्वे मर्गावर मेगाब्लॉक

मध्य रेल्वे मार्गावर दिवा ते कल्याण डाउन जलद मार्गावर सकाळी १०.३० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.  कल्याणहून सुटणाऱ्या अप जलद मार्गाच्या फेऱ्या स. १०.३७ ते दु.३.०६ पर्यंत ठाण्यापर्यंत अप स्लो मार्गावर चालवण्यात येणार आहेत. तर ठाणे आणि सीएसएमटीपर्यंत लोकल नियमित अप फास्ट मार्गावर चालवण्यात येणार आहेत. तसेच या लोकल मुलुंड,  भांडुप, विक्रोळी,  घाटकोपर,  कुर्ला, दादर स्थानकावर थांबणार आहेत. स. ९.२५ ते दु. २.५४ पर्यंत सीएसएमटीहून सुटणाऱ्या सर्व डाउन फास्ट लोकल  आपल्या निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने धावणार असून या लोकल घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड स्थानकांवर थांबणार आहेत. तसेच ब्लॉक दरम्यान सकाळी ११ ते दुपारी ५ वाजेपर्यत  सीएसटीला येणाऱ्या आणि जाणाऱ्या धिम्या मार्गावरील लोकल गाडया १० मिनिटे उशिराने धावणार आहेत.

हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

हार्बर मार्गावरील पनवेल ते नेरुळ तसंच डाऊन मार्गावरुन सकाळी ११.३० ते दुपारी ४.३० वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. सकाळी ११.६ वाजता ते दुपारी ४.३० वाजता पनवेल-बेलापूरहून सीएसटीएमच्या दिशेने सुटणा-या सर्व अप-डाऊन हार्बर मार्गावरील गाड्या सेवा बंद असणार आहेत. तर, सकाळी ११.१४ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ठाण्याहून पनवेलला सुटणा-या सर्व डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील गाड्या तसंच सकाळी ११.२ ते दुपारी ४.२६ वाजेपर्यंत ठाण्यासाठी पनवेलहून सुटणाऱ्या सर्व अप-ट्रान्सहार्बर गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. ब्लॉक दरम्यान पनवेल-अंधेरी सेवा रद्द करण्यात येणार आहे. या काळा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- नेरूळ आणि वाशी येथे विशेष सेवा चालवल्या जाणार आहेत.

पश्चिम रेल्वेवर जम्बो ब्लॉक

पश्चिम रेल्वेवर बोरीवली ते नायगाव स्थानकांदरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत अप आणि डाउन धिम्या मार्गावर ब्लॉक घेतला जाणार आहे. सांताक्रूझ आणि माहिम स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी १०.३५ ते १५.३५ या वेळेत जम्बो  ब्लॉक घेतला जाणार आहे. ब्लॉक दरम्यान अप आणि डाऊन फास्ट लोकल सांताक्रूझ आणि माहीम स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर चालणार आहेत. तसेच या ब्लॉकमुळे काही उपनगरीय सेवा रद्द करण्यात येणार असून त्यांची यादी सर्व स्टेशनवर उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनानं दिली आहे.

 

 

COMMENTS