मुंबई – राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक संपली असून या बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या जागांच्या ठिकाणी काय चुका झाल्या आणि तिथं काय करायला हवं याचा आढावा या बैठकीत घेतला असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांनी दिली आहे. ज्या ठिकाणी वारंवार अपयश आलेले आहे तिथं नवीन चेहरा आणि प्रामुख्यानं तरूण चेहरा देण्याचा विचार झाला आहे. परंतु नेतृत्व बदलाचा विचार करण्यैत आला नसल्याचं नाईक यांनी म्हटलं आहे.
तसेच पक्षाच्या विलिनीकरणाचा विषय झालेला नाही असंही नाईक यांनी म्हटलं आहे.
दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी विरोधात असताना जसा पक्ष मजबूत केला गेला, तशा प्रकारे काम केले जाणार आहे. तसेच बहुजन वंचितला आघाडीत घेण्यासंदर्भात विचार झाला, परंतु अनेकांनी ते आघाडीत येणारच नसल्याचे सांगितले असल्याचं गणेश नाईक म्हणाले. तसेच लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे चिंतन या बैठकीत करण्यात आले असून विजयी झालेल्या आणि पराभव झालेल्या मतदारसंघांची तपशीलवार माहिती घेतली गेली असल्याचंही नाईक यांनी म्हटलं आहे
COMMENTS