मुंबई – भाजपाने मुंबई पदविधर मतदार संघातून अत्यंत तरूण आणि उच्च शिक्षित विद्यार्थी चळवळीतून आलेल्या आपल्या कार्यकर्त्याला तसेच मुंबईतील गृहनिर्माण सोसायट्यांचे हक्क, ग्राहक संरक्षण आणि भाडेकरून हक्कासाठी न्यायालयीन संघर्ष करणारा कार्यकर्ता म्हणून सुपरिचीत असणा-या अॅड. अमित मेहता यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या आदेशाप्रमाणे मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी अॅड. महेता यांची उमेदवारी आज जाहीर केली आहे. आज कोकण भवन येथे दुपारी 1 वाजता ते आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
अॅड. अमित महेता यांचा परिचय
अॅड. अमित महेता हे जन्माने मुंबईकर असून ते गोरेगाव येथे वास्तव्यास आहेत. विद्यार्थी चळवळीपासून ते सक्रिय काम करीत असून आता मुंबई भाजपाचे उपाध्यक्ष व ग्राहक संरक्षण सेलचे प्रमुख म्हणूनही कार्यरत आहेत. भाजपाचा तरूण उच्चशिक्षित सक्रिय कार्यकर्ता अशी त्यांचे ओळख आहे. अॅड. अमित महेता यांचे शिक्षण इंजिनिअरींग, एमबीए, आणि कायद्याची पदवी (एलएलबी) असे असून ते लॉ फर्मचे मॅनेजिंग पार्टनर आहेत. या फर्म मध्ये 150 वकिल काम करतात. तसेच अॅड. अमित महेता यांची फर्म ही ग्राहक संरक्षण, गृहनिर्माण सोसायटयांचे हक्क, भाडेकरू संरक्षण व त्यांचे हक्क, धार्मिक स्थळांचे संरक्षण या विषयात काम करते.
दरम्यान आजपर्यत शेकडो मुंबईकरांना न्याय मिळवून देण्यात त्यांना यश आले. महा रेरा या कायद्याची जनजागृती व्हावी व ग्राहकांचे हक्क संरक्षीत व्हावे म्हणून त्यांनी गेल्या वर्षभरात 50 हून अधिक ग्राहक व गृहनिर्माण सोसायट्यांचे मेळावेही घेतले आहेत. घर घेणा-यां काही मुंबईकरांची बिल्डरकडून जी फसवणूक झाली होती त्या विरोधात कायदेशीर लढा लढून या मुंबईकरांना न्याय मिळवून देण्यात त्याना यश आले होते. तसेच रेराचा मसूदा तयार होत असतनाही त्यांनी त्या कमिठीमध्ये काम केले होते व त्यामध्ये ग्राहक संरक्षणासाठी आवश्यक असणा-या तरतुदी असाव्यात म्हणून त्यांनी आग्रही भूमिका मांडली होती. तसेच त्यांनी केलेल्या ग्राहक संरक्षण क्षेत्रातील कामाबद्दल विविध पुरस्कारांनीही त्यांना वेळोवेळी सन्मानित करण्यात आले आहे.
COMMENTS