शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर ठाम – संजय राऊत

शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर ठाम – संजय राऊत

मुंबई – शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचं वक्तव्य शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर निवडणुका लढवण्याचा ठराव मंजूर केला असून तो अन्य कुठल्याही पक्षाला बदलता येणार नसल्याचंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेनं स्वबळावर निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान कालच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. या भेटीनंतर लोकसभा निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजपमध्ये युती होणार असल्याचं बोललं जात होतं. परंतु संजय राऊत यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे शिवसेना-भाजपमध्ये युती होणार नसल्याचं दिसून येत आहे.

COMMENTS