राज्य मंत्रिमंडळाची पार पडली बैठक, कोल्हापूर विमानतळाच्या नामकरणाबरोबर इतर महत्त्वाचे निर्णय !

राज्य मंत्रिमंडळाची पार पडली बैठक, कोल्हापूर विमानतळाच्या नामकरणाबरोबर इतर महत्त्वाचे निर्णय !

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत कोल्हापूर विमानतळाच्या नामकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला असून ‘छत्रपती राजाराम महाराज विमानतळ, कोल्हापूर’  असं नामकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबरोबरच इतर काही महत्त्वाचे निर्णयही या बैठकीत घेण्यात आले आहेत.

बैठकीतील महत्त्वाचे निर्णय 

1 महाराष्ट्र स्टेट इनोव्हेटिव्ह स्टार्टअप पॉलिसी-2017 ला मान्यता

2 मराठवाड्यातील वॉटर ग्रीडसाठी मेकोरोट या इस्त्राईल सरकारच्या कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यास मान्यता.

3 अनाथ मुलांच्या सामाजिक-आर्थिक उन्नतीसाठी 1 टक्के समांतर आरक्षण ठेवण्याचा निर्णय.

4 कोल्हापूर विमानतळाचे नामकरण ‘छत्रपती राजाराम महाराज विमानतळ, कोल्हापूर’ करण्याचा निर्णय.

5 ग्रामपंचायतींच्या स्वत:च्या कार्यालयासाठी मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना सुरू करण्यास मान्यता.

6 डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर (मिहान) चे उन्नतीकरण, आधुनिकीकरण, देखभाल-संचलन आदी कामे पीपीपी तसेच डीबीएफओटी तत्त्वावर करण्यासाठी प्रस्ताव मागविण्यास मान्यता.

7 सरपंचांच्या थेट निवडणुकीसंदर्भात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम-1958 च्या काही कलमांमध्ये सुधारणा.

8 सिडको महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व विकास प्रकल्पांसाठी साडे बावीस टक्के विकसित भूखंडाची योजना मंजूर.

9 भूसंपादन अधिनियम-2013 मध्ये सुधारणा.

10 महामंडळाच्या सदस्य संख्या वाढीसाठी महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ अधिनियम-2000 मध्ये सुधारणा.

11 नागरी जमीन कमाल धारणा कलमानुसार औद्योगिक प्रयोजनासाठी सवलत देण्यात आलेल्या जमिनीच्या हस्तांतर शुल्काच्या आकारणीबाबतचा निर्णय.

COMMENTS