मुंबई उत्तर मधून काँग्रेसची उमेदवारी निश्चित !

मुंबई उत्तर मधून काँग्रेसची उमेदवारी निश्चित !

मुंबई – मुंबईतील 6 पैकी पाच मतदारसंघात मोठ्या प्रमाणात इच्छुक असताना मुंबई उत्तर या मतदारसंघातून मात्र काँग्रेसकडून फारसा उत्साह कुणी दाखवला नव्हता. मात्र आता या मतदारसंघातून काँग्रेसनं एका दिग्गज नेत्याला उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. महापॉलिटिक्सला विश्वसनिय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री कृपाशंकर सिंग हे मुंबई उत्तर मधून लढणार आहेत. येत्या एक दोन दिवसात दिल्लीतून हे नाव जाहीर होणार आहे.

गेली दोन वेळा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम या मतदारसंघातून लढले होते. गेल्यावेळी त्यांना भाजपच्या गोपाळ शेट्टी यांच्याकडून दारुण पराभव झाला होता. त्यामुळे निरुपम यावेळी त्या मतदारसंघातून लढण्यास तयार नव्हते. त्यांनी मुंबई उत्तर पश्चिम या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा काँग्रेस हायकमांडकडे व्यक्त केली आहे. त्यानुसार त्यांना मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून तिकीट मिळण्याची शक्यता आहे.

मुंबई उत्तर मधील उत्तर भारतीय मतांचे गणित लक्षात घेऊन कृपाशंकर सिंह यांना मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतल्याचं बोलललं जातंय. या मतदारसंघात उत्तर भारतीय मतांचं प्रमाण लक्षनिय आहे. निरुपम यांच्या तुलनेत कृपाशंकर सिंह हे सर्वांना बरोबर घेऊन जाणारे आहेत. त्यामुळे त्यांना उत्तर भारतीय मते चांगल्या प्रमाणात मिळतील असा यामगाचा उद्देश असल्याचं बोललं जातंय.

COMMENTS