सांगोला – भाजपच्या 16 भ्रष्ट मंत्र्यांसाठीही चंद्रकांत पाटील यांनी जेलमध्ये जागा बघून ठेवावी, असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लगावला आहे. छगन भुजबळ यांच्या बाजुची कोठडी रिकामी असल्याचा इशारा चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांना दिला होता. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी तुमच्या 16 भ्रष्ट मंत्र्यांसाठीही जेलमध्ये जागा बघून ठेवण्याचा टोला लगावला आहे. सोलापुरातील सांगोला तालुक्यातील महूद येथे राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेत ते बोलत होते.
दरम्यान भाजपचा स्थापना दिवस 6 एप्रिल ऐवजी 1 एप्रिल रोजी साजरा करायला हवा होता. खोटे बोलून सर्वांना ‘फूल’ बनवणारे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री असून आजवर जनतेला फसवणारे शक्तिप्रदर्शन करुन स्वतःचीच फसवणूक करुन घेत असल्याची टीकाही मुंडे यांनी केली आहे. शिवसेनेचे मंत्री कॅबिनेटमध्ये निर्णय घेतात आणि उद्धव ठाकरे राज्यभर विरोध करत फिरतात, सत्तेचा मलिदा खाण्यासाठी शिवसेना लाचार असून 2019 पर्यंत 5 मंत्रिपदांची तुकडे चघळत राहा, नंतर जनता तुम्हालाही नीटनेटके करणार असल्याचा इशारा धनंजय मुंडे यांनी यावेळी दिला आहे.
COMMENTS