मुंबई – महाविकास आघाडी सरकारचं खातेवाटप आज जाहीर करण्यात आलं आहे. परंतु या खातेवाटपानंतर राष्ट्रवादीमध्ये मात्र नाराजी असल्याचं दिसत आहे. खातेवाटपानंतर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे नाराज असल्याचं दिसत आहेत. कारण जयंत पाटील यांना पत्रकारांनी खातेवाटपाबाबत विचारले असता त्यांनी बोलणं टाळलं आहे. जयंत पाटील यांनी ‘नो कमेंट्स’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे वित्त आणि नियोजन खाते मिळालेले जयंत पाटील नाराज असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
दरम्यान जयंत पाटील गृह खात्यासाठी आग्रही होते. पण, हे खाते शिवसेनेने स्वत: कडे ठेवले आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना गृह खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा आहे.
कोणत्या नेत्याकडे कोणते खातं?
एकनाथ शिंदे
गृह, नगरविकास, वने, पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, मृदा व जलसंधारण, पर्यटन, सार्वजनिक बांधकाम, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण
सुभाष देसाई
उद्योग आणि खनिकर्म, उच्च व तंत्रशिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याण, कृषी, रोजगार हमी योजना, फलोत्पादन, परिवहन, मराठी भाषा आणि सांस्कृतिक कार्ये, राजशिष्टाचार, भूकंप पुनर्वसन, बंदरे आणि खारभूमी विकास
छगन भुजबळ
ग्रामविकास, जलसंपदा व लाभक्षेत्रक विकास, सामजिक न्याय व विशेष सहाय्य, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास आणि उद्योजकता, अन्न व औषध प्रशासन
जयंत पाटील
वित्त आणि नियोजन, गृहनिर्माण, सार्वजनिक आरोग्य, सहकार व पणन, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक सरंक्षण, कामगार, अल्पसंख्यांक विकास,
बाळासाहेब थोरात
महसूल, ऊर्जा व अपारंपारिक उर्जा, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण, पशू संवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय
नितीन राऊत
सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), आदिवासी विकास, महिला व बाल विकास, वस्त्रोद्योग, मदत व पुनर्वसन, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त, जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण
COMMENTS