कोलकाता – केंद्र सरकारने आधार कार्डला मोबाईलशी जोडणे बंधनकारक केले आहे. 23 मार्चपर्यंत प्रत्येक मोबाईल ग्राहकाने मोबाईल नंबरसोबत आधार लिंक करायचा आहे. अन्यथा त्यानंतर सेवा खंडित करणार असल्याचे सरकारने सांगितले आहे.
तृणमूल काँग्रेसच्य़ा अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मात्र केंद्र सरकारच्या या निर्णयाला विरोध केला आहे. ममता बॅनर्जी म्हणतात की, ‘केंद्र सरकारच्या या निर्णयाचे मी विरोध करते आणि म्हणून मी मोबाईल नंबर आधार कार्डशी जोडणार नाही. ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथे कार्यकर्त्यांना संबोधित करताना केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले.
यावेळी ममता बॅनर्जी म्हणाल्या की, आधार क्रमांक मोबाईलशी जोडणे हा खासगीपणाच्या अधिकाराचे उल्लंघन आहे. पती-पत्नीचे फोनवरील संभाषणही मग जगजाहीर केले जाईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. मी माझा मोबाईल क्रमांक आधारशी जोडणार नाही. माझा मोबाईल क्रमांक बंद केला तरी चालेल’ असे त्यांनी सांगितले. माझ्यासह अन्य लोकांनीही आधार- मोबाईलशी जोडण्यास विरोध करावा, असे आवाहन त्यांनी केले.
8 नोव्हेंबररोजी काळा दिवस पाळण्यात येईल आणि राज्यभरात तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते काळे झेंडे हाती घेऊन रॅली काढतील, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. गेल्या वर्षी 8 नोव्हेंबररोजी पंतप्रधान मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेतला होता. या निषेधार्थ ममता बॅनर्जी यांनी आंदोलनाची घोषणा केली.
I will not link #Aadhaar with phone, if they want to disconnect my phone, let them: West Bengal CM Mamata Banerjee pic.twitter.com/bSWPTOcGxU
— ANI (@ANI) October 25, 2017
COMMENTS