मुंबई – राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये नगर पंचायतचा अध्यक्ष थेट जनतेतून निवडला जाणार आहे. यापूर्वी राज्य सरकरानं नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा फायदा भाजपला झाला होता. त्यानंतर ग्रामपंचायतमध्ये सरपंचाची निवडही थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आज नगर पंचायतमध्येही अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया थेट जनतेतून होणार आहे.
COMMENTS