रेल्वे पुलांच्या दुरुस्तीसाठी सचिनकडून दोन कोटी

रेल्वे पुलांच्या दुरुस्तीसाठी सचिनकडून दोन कोटी

मुंबई – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मुंबईतील रेल पादच्या ओव्हरब्रिजेजच्या दुरुस्तीसाठी खासदार निधीतून दोन कोटी रुपये मंजूर केले आहेत. एलफिन्स्टन रेल्वे स्टेशनवरील चेंगराचेंगरीच्या भीषण दुर्घटनेनंतर सचिनने ही मदत जाहीर केली आहे. 

एलफिन्स्टन स्थानकातील दुर्घटनेत अनेकांना आपला जीव गमवावा लागला. 29 सप्टेंबरला झालेल्या जोरदार पावसामुळे एल्फिन्स्टन रोड आणि परेल उपनगरीय स्थानकांशी जोडलेल्या एका अरुंद पाऊल ओव्हरब्रिजवर अचानक झालेल्या चेंगराचेंगरीत 23 जण ठार झाले.

यासंदर्भात सचिनने रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना पत्र लिहिले आहे.  मुंबईतील रेल्वे पादचारी पुलांचे नव्याने बांधकाम करण्यासाठी दोन कोटी रुपयांची गरज असून, त्यासाठी एक कोटी पश्‍चिम आणि मध्य रेल्वेसाठी, तर उर्वरित रक्‍कम हार्बर स्थानांकवरील पादचारी पुलांच्या बांधकामासाठी वापरण्यात येतील.  त्यामुळे पादचारी पुलांच्या बांधकामासाठी मी तातडीने मदत करीत असल्याचे त्याने पत्रात म्हटले आहे. ‘अशा प्रकारची घटना फक्‍त मुंबईतच नव्हे तर, देशातही घडू नये याची खबरदारी एक जबाबदार नागरिक म्हणून घेणे आवश्यक असल्याचेही सचिनने 16 ऑक्टोबर रोजी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.  या पत्राची एक प्रत मुंबई उपनगर जिल्हाधिकार्‍यांनही देण्यात आली आहे. उपनगरीय रेल्वे सेवांसाठी दोन स्वतंत्र विभाग तयार करण्याचा विचार देखील केला जावा अशी मागणी सचिनने केली आहे.

COMMENTS