नागपुरात मुख्यमंत्र्यांचे कार्यकर्ते आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी !

नागपुरात मुख्यमंत्र्यांचे कार्यकर्ते आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी !

नागपूर – नागपुरात काल रात्री अजनी भागात दोन गटात तूफान हाणामारी झाली. यामध्ये दोन्ही बाजुचे अनेक कार्यकर्ते जखमी झाले आहेत. भाजपचे नेते ओमप्रकाश उर्फ मुन्ना यादव हे मुख्यमंत्र्यांचे खास कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. यादव यांचे सहकारी आणि काँग्रेसचे स्थानिक नेते मंगल यादव यांचे सहकारी यांच्यात तुफान हाणामारी झाली. यामध्ये अनेक कार्यकर्ते जखमी झाले आहेत.

भाजप नेते ओमप्रकाश यादव, त्यांचा भाऊ आणि सहकारी यांच्या विरोधात धंतोली पोलीस  स्टेशन मध्ये कलम 307 ( हत्येचा प्रयत्न) कलम 143 ( दंगल  करणे ) असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मंगल यादव गटावर ही मारहाण आणि दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

COMMENTS