नागपूर आमदार निवासात एकाचा मृत्यू !

नागपूर आमदार निवासात एकाचा मृत्यू !

नागपूर  – आमदार निवासात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. विनोद अग्रवाल  असं मृत व्यक्तीचं नाव असून  50 वर्षे वयाचे असल्याची माहिती आहे. मृतदेह विंग क्रमांक 2 मधील खोली क्रमांक 46 मध्ये सापडला असून ही खोली अंधेरीचे आमदार रमेश नटके यांच्या नावे राखीव आहे.

दरम्यान विनोद अग्रवाल यांचा मृत्यू कसा झाला याचा तपास पोलीस करत आहेत. तसेच विनोद अग्रवाल हे आमदाराच्या सहायकाचे परिचित असल्याची माहिती असून त्यांच्या मृत्यू नेमका कसा झाला तसेच घातपात झाला नाही ना याबाबतचा अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे. दरम्यान उद्यापासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. परंतु आज घडलेल्या या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण पहावयास मिळत आहे.

COMMENTS