नागपूर – हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सर्व आमदार सध्या नागपूरमध्ये आहेत. आमदार निवासाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. काल समाजवादी पार्टीचे आमदार अबु आझमी यांच्या खोलीत साप घुसला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. व्हरांड्यातून साप आझमी यांच्या खोलीत शिरला. त्यामुळे आसपासच्या खोलीतील आमदारांची पळापळ सुरू झाली. त्यानंतर सर्पमित्रांना पाचारण करण्यात आले. ब-याच वेळेच्या प्रयत्नानंतर सापाला पकडण्यात यश आलं. मात्र यामुळे आमदार निवासाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी जबावदार व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी आमदार अबु आझमी यांनी केली आहे.
COMMENTS