नागपूर – आगामी लोकसभा निवडणूक नितीन गडकरी यांच्याविरोधात लढवणार असल्याचे संकेत काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी दिले आहेत. पक्षानं सांगितलं तर आपण नितीन गडकरींविरोधात निवडणूक लढणार असल्याचं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे. ‘भाजपनं चॅलेंज केलं होतं की मला लोकसभा आणि विधानसभेत जाऊ देणार नाही, मला रस्त्यावर फिरण्यास भाग पाडतील. आता हे चँलेंज मी स्वीकारतो’ असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
दरम्यान नाना पटोले यांच्या वक्तव्यावरुन काँग्रेसनं भाजपविरोधात रणनिती आखली असल्याचं दिसत आहे. त्यामुळे काँग्रेसनं जर नाना पटोले यांना गडकरींविरोधात उमेदवारी दिली तर ही निवडणूक मोठी प्रतिष्ठेची ठरणार आहे. तसेच नाना पटोले यांचा भंडारा- गोंदिया हा मतदारसंघ आहे. तर नागपूर हा भाजपचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे भाजपच्या बालेकिल्ल्यातून ही निवडणूक जिंकणं पटोलेंसाठीही मोठं आव्हान असणार आहे.
COMMENTS