नाना पटोलेंची ‘पश्चाताप’ यात्रा, यात्रेनंतर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार ?

नाना पटोलेंची ‘पश्चाताप’ यात्रा, यात्रेनंतर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार ?

नागपूर – शेतक-यांच्या प्रश्नांबाबत पक्षाच्या विरोधात उतरुन खासदारकीचा राजीनामा देणारे नाना पटोले आता पश्चाताप यात्रा काढणार आहेत. येत्या 12 जानेवारीपासून सिंदखेडराजा येथून पश्‍चाताप यात्रा काढण्यात येणार आहे. तसेच या यात्रेचा शेवट छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला म्हणजे 19 फेब्रुवारीला साकोली येथे होणार आहे. या  यात्रेच्या शेवटच्या दिवशी नाना पटोले पुढील राजकीय दिशेची घोषणा करणार असल्याची चर्चा आहे. निवडणुकीपूर्वी भाजपने अनेक आस्वासने दिली परंतु त्याची पूर्तता केली नसल्यामुळे पश्चाताप यात्रा काढण्यात येणार असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थळापासून काढण्यात आलेली ही यात्रा विदर्भातील सहा जिल्ह्यातून निघणार आहे. तसेच या यात्रेदरम्यान या विभागातील शेतक-यांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. तसेच नाना पटोले हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. याबाबत त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचीही भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या यात्रेच्या समारोपाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार असल्याची चर्चा असून समारोपाच्या दिवशीच पटोले काँग्रेसमध्ये जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

COMMENTS