नवी दिल्ली – अण्णा हजारेंच्या सर्व मागण्या या केंद्राच्या अखत्यारितील आहेत. परंतु त्यांचा अपमान करण्यासाठी राज्यातला मंत्री पाठवण्यात आला आहे. त्यामुळे हा अण्णा हजारेंचा अपमान असून ”एवढ्या वयाचा माणूस, जो आज देशासाठी लढतोय, त्याचा अपमान ही जनता कधीही सहन करु शकणार नाही असा इशारा भाजपचे माजी खासदार आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. नाना पटोले यांनी आज अण्णा हजारेंची भेट घेतली असून त्यांनी अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.
दरम्यान यावेळी अण्णांशी बोलताना त्यांच्या डोळ्यात पाणी आलं असून त्यांच्या डोळ्यातले अश्रू पाहून माझ्याही डोळ्यात अश्रू आले असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. त्यामुळे अण्णांशी चर्चा करण्याची जबाबदारी राज्याच्या मंत्र्याकडे न देता हा विषय केंद्रातला असल्यामुळे केंद्रातील मंत्र्यावरच याबाबतची जबाबदारी सोपवणं गरजेचं होतं असही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
COMMENTS