ब्रेकिंग न्यूज – नाना पटोले काँग्रेसच्या वाटेवर !

ब्रेकिंग न्यूज – नाना पटोले काँग्रेसच्या वाटेवर !

दिल्ली – मोदी सरकारच्या सरकारविरोधी धोरणांचा निषेध सकाळीच भाजपच्य खासदारकीची राजीनामा दिलेले नाना पटोले हे काँग्रेसच्या वाटेवर आहेत. दिल्लीत महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी मोहन प्रकाश यांच्यासोबत त्यांची बैठक सुरू आहे. या बैठकीत त्यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचीही भेट घेतली होती. सकाळी राजीनामा देण्यापूर्वीही त्यांनी काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या माध्यमातून राहुल गांधी यांच्याशी चर्चा केल्याचं बोललं जातंय. त्यामुळे पूर्वीचे काँग्रेसचे असलेले नाना पटोले हे घरवापसी करतील अशीच शक्यता आहे.

COMMENTS