नांदेड जिल्हा परिषदेच्या माजी सदस्याची हत्या!

नांदेड जिल्हा परिषदेच्या माजी सदस्याची हत्या!

नांदेड – जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिनकर शेवाळे यांची मंगळवारी हत्या करण्यात आली आहे. शेवाळे यांची धारदार शस्त्राने वार करुन त्यांची हत्या करण्यात आली आहे. त्यांच्या राहत्या घरी घटना घडली आहे. तसेच पोलिसांनी आरोपीस अटक केली असून अधिक तपास सुरु आहे.

नांदेडमधील देशमुख कॉलनीमध्ये ही घटना घडली असून पैशाच्या वादातून त्यांचा खून केला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच याबाबत अधिक तपास सुरु असल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे. दिवसाढवळ्या शेवाळेंची हत्या झाल्यामुळे नांदेड परिसरात तणावाचं वातावरण आहे.

COMMENTS