नांदेड महापौरपदी कॉंग्रेसच्या शीला भवरे तर उपमहापौरपदी विनय गिरडे पाटील

नांदेड महापौरपदी कॉंग्रेसच्या शीला भवरे तर उपमहापौरपदी विनय गिरडे पाटील

नांदेड- नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या महापौरपदी शीला किशोर भवरे यांची तर उपमहापौरपदी विनय गिरडे पाटील यांची निवड झाली आहे. आज महापालिकेत झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली. महापौर पदासाठी शीला भवरे यांना ७४ तर भाजपाच्या बेबीताई गुपिले यांना ६ मते मिळाली. 

नांदेड महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळवलेल्या काँग्रेस पक्षाच्यावतीने कोणाची निवड होणार याची उत्सुकता होती. मागील महिन्यात झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने 81 जागांपैकी तब्बल 73 जागा मिळाल्या होत्या. महापौरपद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव होते. त्यानुसार दलित समाजाच्या शीला भवरे यांना अशोक चव्हाण यांनी संधी दिली आहे.

COMMENTS