पंचायत समितीची तालुकास्तरीय  ‘स्वच्छता मित्र’ वक्तृत्व स्पर्धा संपन्न !

पंचायत समितीची तालुकास्तरीय ‘स्वच्छता मित्र’ वक्तृत्व स्पर्धा संपन्न !

नाशिक – नांदगावमधील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व तालुका पंचायत समितीतर्फे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. वरीष्ठ व कनिष्ठगट अशा दोन गटात ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेतील वरीष्ठ गटात प्रथम निता उगले, द्वितीय बळीराम बोरसे, तृतिय कोमल सोनवणे तर कनिष्ठ गटातुन प्रथम स्नेहल पवार, वडाळी बु.,द्वितीय प्रियंका कापडणीस, नांदगाव तर तृतिय भाग्यश्री राऊत, जातेगाव या विद्यार्थीनींनी यश संपादन केले आहे.

 

विद्यार्थ्यांनी आपल्या विविध कलांचा वापर करून समाजात पर्यावरणपुरक, स्वच्छता व इतर विविध समस्यांबाबत जनजागृतीत भर घालावी या हेतुने शासन स्तरावर पंचायत समितीद्वारे वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जे.टी.सूर्यवंशी यांनी दिली.

COMMENTS