नंदुरबार पालिकेत काँग्रेस आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये राडा !

नंदुरबार पालिकेत काँग्रेस आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये राडा !

नंदुरबार – नंदुरबार पालिकेत काँग्रेस आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये राडा झाला असल्याचं पहावयास मिळालं आहे. पालिकेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत काँग्रेस व भाजपचे नगरसेवक एकमेकांना भिडल़े होते. आयत्या वेळच्या विषयावरुन झालेल्या या वादात नगरसेविका संगीता सोनवणे यांच्या पतीच्या डोक्याला जबर दुखापत झाली असून हा वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहचला होता.

मंगळवारी नंदुरबार पालिकेची सर्वसाधारण सभा होती़ या वेळी आयत्या वेळेच्या विषयावरुन काँग्रेस व भाजप नगरसेवक यांच्यात प्रचंड राडा झाला़. दोन्ही गटाच्या समर्थकांनी पालिका आवारात प्रचंड गर्दी केली होती़. दोन्ही गट एकमेकांवर धावून गेल्याने प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होत़े. याबाबत दोन्ही गट शहर पोलीस ठाण्यात गेले व तिथेही संबंधितांमध्ये बाचाबाची झाली़ असल्याचं पहावयास मिळालं आहे. दरम्यान, या वादाचे पडसाद सराफा बाजार व मंगळ बाजारातही जाणवल़े असून अफवांमुळे नागरिक सैरावैरा पळू लागल्याने शहरात काही काळ तणावाचं वातावरण पहायला मिळालं आहे.

 

COMMENTS