मुंबई – महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना भाजपनं राज्यसभेची ऑफर दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राणे यांनी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राणेंना ही ऑफर दिली असल्याची माहिती आहे. गेली अनेक दिवसांपासून नारायण राणे हे मंत्रिपदाची वाट पाहत आहेत. परंतु त्यांना मंत्रिपदाऐवजी राज्यसभेवर पाठवलं जाण्याचा विचार भाजपकडून सुरु असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान बुधवारी मुख्यमंत्र्यांनी राणेंना राजभवनावर बोलवून घेतले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाजपकडून त्यांचा विचार राज्यसभेसाठी केला जात असल्याचं म्हटलं आहे. तसेच राज्यसभेवर राणेंना पाठवण्यासाठी ते स्वतः आग्रही असल्याचंही बोललं जात आहे. परंतु 2019 ला राज्याच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे राणे राज्यसभेचे हे गाजर स्वीकारतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
COMMENTS