नारायण राणेंनी घेतली छगन भुजबळांची भेट, अर्धा तास झाली चर्चा !

नारायण राणेंनी घेतली छगन भुजबळांची भेट, अर्धा तास झाली चर्चा !

मुंबई – महाराष्ट्र स्वभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार नारायण राणे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची भेट घेतली आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राणे यांनी भुजबळांची पहिल्यांदाच भेट घेतली आहे. नारायण राणे यांनी वांद्रे येथील एमईटी संस्थेत  छगन भुजबळ यांची भेट घेतली. तसेच या दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली असल्याची माहिती आहे. त्यामुळे या दोघांमध्ये काय चर्चा झाली असावी याबाबतचे तर्कवितर्क राजकीय वर्तुळात लढवले जात आहेत.

दरम्यान छगन भुजबळ हे तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर राजकीय वर्तुळातील अनेक नेते त्यांची भेट घेत आहेत.यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, गिरीश महाजन, शरद यादव यांनी भुजबळांची भेट घेतली आहे.  तसंच लालूप्रसाद यादव यांनीही भुजबळ यांच्याशी फोनवरुन चर्चा केली होती. याच पार्श्वभूमीवर राणे यांनीही भुजबळांची भेट घेतली आहे. परंतु त्यांच्यामध्ये अर्धा तास झालेल्या चर्चेचं कारण मात्र गुलदस्त्यात आहे.

 

COMMENTS