सिंधुदुर्ग – गेली काही दिवसांपासुन खासदार नारायण राणे यांचा स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. परंतु याबाबतची तारीख ठरली नव्हती. आज अखेर स्वत: नारायण राणे यांनी पत्र विलिनीकरणाची तारीख जाहीर केली आहे.
कणकवली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 15 तारखेला जाहीर सभा होणार आहे. या सभेत स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन करणार असल्याची माहिती खासदार नारायण राणे यांनी दिली आहे. सावंतवाडी आणि कुडाळ येथे राणेंच्या आज बेठका झाल्या त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही घोषणा केली आहे.
नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमातही उपस्थिती लावली होती. या पार्श्वभूमीवर आता स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन करण्याची तारीख नारायण राणे यांनी जाहीर केली आहे. त्यामुळे नारायण राणे हे आता पूर्णपणे भाजपवाशी होणार असल्याचं दिसत आहे.
दरम्यान यावेळी राणे यांनी राजन तेली यांच्यासोबत सुरु असलेला संघर्ष मिटला असल्याचं म्हटलं आहे. आपला भाजपा पुरस्कृत अपक्ष उमेदवार राजन तेली यांना पूर्ण पाठिंबा असल्याचं राणेंनी यावेळी जाहीर केले आहे.
COMMENTS