काँग्रेसमध्ये जाणार का ? नारायण राणे यांची प्रतिक्रिया !

काँग्रेसमध्ये जाणार का ? नारायण राणे यांची प्रतिक्रिया !

नवी दिल्ली – भाजपचे सहयोगी खासदार आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी काँग्रेसमध्ये जाणार का याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या सर्व बातम्या खोट्या आहेत. माझा आणि काँग्रेसचा काहीही संबंध नाही, असे स्पष्टीकरण राणे यांनी दिलं आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी नारायण राणे यांना काँग्रेसकडून पक्षात येण्याची ऑफर दिली असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. तसेच दिल्लीतल्या काँग्रेसच्या नेत्यांनी राणे यांना काँग्रेसमध्ये आणण्यासाठी पुढाकार घेतला असल्याचीही चर्चा झाली होती. परंतु या सगळ्या अफवा असल्याचे राणे यांनी म्हटले आहे.

दरम्यान नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या एनडीएच्या बैठकीसाठी राणे आज दिल्लीत दाखल झाले होते. या बैठकीपूर्वी माध्यमांच्या प्रतिनिधींनी राणे यांना काँग्रेस प्रवेशाविषयी विचारले होते. त्यावर राणे यांनी प्रतिक्रिया दिली. माझा आणि काँग्रेसचा काहीही संबंध नाही, असे स्पष्टीकरण राणे यांनी दिलं आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी नारायण राणे यांना काँग्रेसकडून पक्षात येण्याची ऑफर दिली असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. तसेच दिल्लीतल्या काँग्रेसच्या नेत्यांनी राणे यांना काँग्रेसमध्ये आणण्यासाठी पुढाकार घेतला असल्याचीही चर्चा झाली होती.परंतु असं काहीही नसल्याचं राणे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS