लोकसभेत पराभूत झालेल्या खैरेंचं पूनर्वसन,  उद्धव ठाकरेंनी दिलं ‘हे’ आश्वासन ?

लोकसभेत पराभूत झालेल्या खैरेंचं पूनर्वसन, उद्धव ठाकरेंनी दिलं ‘हे’ आश्वासन ?

मुंबई – लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला आहे. एमआयएमच्या इम्तियाज जलील यांनी त्यांचा पराभव केला. लोकसभा गमावल्यानंतर खैरेंचे राज्यात पुनर्वसन केले जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. याबाबत खैरेंना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यात एखादे मंत्रीपद देण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीतील पराभव खैरे यांना जिव्हारी लागला आहे. या पराभवामुळे ते नाराज झाले आहेत. निकालानंतर खैरे यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत खैरेंना राज्यात एखादे मंत्रीपद देण्याचे उद्धव यांनी आश्वासन दिले असल्याची माहिती मिळाली आहे. येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत औरंगाबादमध्ये एमआयएमला रोखण्यासाठी शिवसेनेकडून हे पाऊल उचललं जाणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान खैरे यांच्या पराभवामुळे शिवसेनेचा हा गड तब्बल 20 वर्षांनी खालसा झाला आहे. वंचित बहुजन आघाडीचे इम्तियाज जलील यांनी चंद्रकांत खैरे यांना पराभवाची धूळ चारली. या पराभवामुळे खैरे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. विजयी उमेदवार इम्तियाज जलील आणि विरोधकांना सोडणार नाही,’ असे खैरेंनी म्हटलं आहे. तसेच या पराभवाचं उत्तर आता खैरे विधानसभेतून देणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS