मुंबई – नारायण राणेंना राज्यसभेवर पाठवण्याबाबत शिवसेनेनं काही प्रश्न उपस्थित केले होते. त्या प्रश्नावर बोलत असताना नारायण राणे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. मला विरोध करण्याची शिवसेनेची औकात नसल्याचं वक्तव्य राणे यांनी केलं आहे. तसेच
मला राज्यसभेवर पाठवल्याबाबत मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपमधील सर्व आमदारांचे आभार मानतो असंही राणे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान राज्यसभेत महाराष्ट्राचे प्रश्न उपस्थित करणार असून माझा पक्ष भाजपमध्ये विलीन करण्याबाबत अजुन काही निर्णय घेतला नसल्याचं ते म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका करत जसे सांगतात तसे वागत नाही त्याला शिवसेना म्हणतात. सत्तेतून शिवसेना बाहेर पडू शकत नाही. तसेच राज्यसभेबाबत शिवसेनेचे आमदार अभिनंदन करत असून कदाचित उद्धव ठाकरे यांचाही मला फोन येऊ शकतो असंही राणे यांनी म्हटलं आहे. तसेच शिवसेनेसोबत निवडणूक लढवायची किंवा नाही त्याबाबत आरएसएस आणि भाजप निर्णय घेतील. तसेच शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तरी देशात आणि राज्यात काही फरक नसल्याचा दावाही राणे यांनी केला आहे.
तसेच राज्यसभेत काम करायला मिळणं ही मोठी संधी असून मी पूर्णपणे समाधानी असल्याचंही राणे यांनी म्हटलं आहे. तसेच मी भाजपचा खासदार असून एबी फॉर्म भाजपचा भरला आहे. सिंधदुर्गच्या राजकारणात भाजपशी तडजोड करणार असल्याचंही राणे यांनी म्हटलं आहे. तसेच काँग्रेस आमदार नितेश राणे यांना वाटलं तर ते काँग्रेसमध्ये आमदार म्हणून राहू शकतात. त्यांच्याबाबत मी आता काही सांगू शकत नाही. मी जर तर ला उत्तर देत नाही असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
COMMENTS