धुळे – राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच करण्यात येणार आहे. नारायण राणे यांना स्थान मिळण्याची शक्यता आहे. मात्र एकनाथ खडसेंना काहीच मिळणार नसल्याच दिसतय.
‘ज्यांनी पक्षामध्ये आपलं संपूर्ण आयुष्य घालवलं आणि सत्ता आणली, ते आज पक्षाबाहेर आहेत आणि नारायण राणेंसारखे त्यागी नेते पक्षामध्ये येत आहेत, अशा बोचरी टीका माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपवर केली.
धुळे शहरात एका प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. राजवाडे संशोधन मंडळातर्फे आणीबाणी-चिंता आणि चिंतनाचा विषय या पुस्तकाचं प्रकाशन झालं. यावेळी एकनाथ खडसेंसोबत भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू हेही उपस्थित होते. पक्षाबाहेर ठेवल्याची आपल्या मनातील खंत एकनाथ खडसे यांनी श्याम जाजू यांच्यासमोर व्यक्त केली. आपली जबाबदारी आता फक्त प्रशिक्षणाचीच उरल्याचा टोला लगावत एकनाथ खडसेंनी श्याम जाजू यांनी लगावला.
COMMENTS