भारतीय सैन्य बांधणार एलफिन्स्टन स्थानकावरील पूल

भारतीय सैन्य बांधणार एलफिन्स्टन स्थानकावरील पूल

मुंबई – एल्फिन्स्टन रोड स्थानकातील पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेला एक महिना उलटला आहे. आता या अरुंद पुलाचे नव्याने निर्माण करण्याचे काम भारतीय लष्कराकडे देण्यात आल्याची घोषणा संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. यावेळी त्यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दुर्घटनाग्रस्त पुलाची पाहणी केली.

यापूर्वी कॉमन वेल्थ स्पर्धेच्या वेळी  दिल्लीत पूल कोसळल्यानंतर अशाच प्रकारे पूल बांधण्यात आला होता. या ठिकाणी भारतीय लष्कराने विक्रमी वेळेत त्या पुलाची निर्मिती केली होती. मुंबईतील पूल निर्मितीचे हे काम लष्कराची अभियांत्रिकी शाखा करणार असून ५ नोव्हेंबरला या पादचारी पुलाच्या कामाला सुरुवात होणार आहे. ३१ जानेवारीपर्यंत निश्चित केलेल्या तीनही पुलांचे काम पुर्ण होणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

COMMENTS