भाजपचा ‘तो’ आग्रहही राणेंना अमान्य, पंतप्रधान मोदींची भेट घेणार !

भाजपचा ‘तो’ आग्रहही राणेंना अमान्य, पंतप्रधान मोदींची भेट घेणार !

मुंबई – महाराष्ट्र स्वाभीमानी पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणेंची भाजपवरील नाराजी आता वाढत असल्याचं दिसत आहे. कारण मंत्रीपदाऐवजी भाजप त्यांना विवध ऑफर देत आहे. परंतु राणे ते फेटाळत असल्याचं दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच राणेंना भाजपकडून लोकसभेची ऑफर आली असल्याची माहिती आहे. परंतु त्यांनी तीही धुडकावून लावल्याचं कळत आहे. तसेच राणेंनी नाशिकमधून निवडणूक लढवावी असा भाजपचा आग्रह आहे. परंतु तोही नारायण राणेंना अमान्य असल्याचं दिसत आहेत. कारण नाशिक हा पर्याय असू शकत नाही. मला कसे निवडून आणायचे हा विषय मुख्यमंत्र्यांचा प्रश्न आहे. त्याचे अन्यही अनेक पर्याय आहेत असं राणेंनी म्हटलं आहे. तसंच 13 फेब्रुवारीला पंतप्रधान मोदींची भेट घेणार असल्याचंही राणेंनी म्हटलं आहे.

दरम्यान मराठवाडय़ाच्या विकासाकडे दुर्लक्ष झाल्याने या भागात आक्रोश आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्नही रेंगाळलेला आहे. त्यामुळे या भागात पक्षाच्या वाढीला अधिक वाव असल्याचेही राणेंनी म्हटलं आहे. तसेच सत्तेत नारायण राणे यांना सहभागी करून घेतले तर सरकार पडेल, अशी शंका भाजपमधील नेत्यांना आहे. ती पूर्णत: चुकीची असून आपण मुख्यमंत्र्यांना पटवून दिले आहे. तसेच याबाबात आपण स्वत: पंतप्रधानांना सांगण्यासाठी १३ फेब्रुवारी रोजी त्यांची भेट घेणार असल्याचही नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS