राणेंच्या पक्षाचा झेंडा आहे तरी कसा? पहिल्या सभेसाठी कोल्हापूरचीच का केली निवड?

राणेंच्या पक्षाचा झेंडा आहे तरी कसा? पहिल्या सभेसाठी कोल्हापूरचीच का केली निवड?

कोल्हापूर – काँग्रेस सोडल्यानंतर नारायण राणे यांनी शुक्रवारी कोल्हापूरमध्ये पहिली सभा घेतली. या सभेत त्यांनी त्यांच्या महाराष्ट्र् स्वाभिमान पक्षाच्या झेंड्याचं अनावरण केलं. या झेंड्यात भगवा, निळा आणि हिरवा या रंगांना स्थान देण्यात आलं आहे. त्यात मध्यभागी पांढऱ्या रंगात वज्रमुठ आहे. ‘दिलेला शब्द पाळणार’ हे महाराष्ट्र् स्वाभिमान पक्षाचं ब्रीदवाक्य आहे.

या सभेतील भाषणादरम्यान शिवसेनेवर जोरदार प्रहार केला. आमच्यासारखे शिवसेनेत होते म्हणून शिवसेनेची दहशत झाली, रुबाब वाढवला. आणि उद्धव म्हणतो आम्ही बाळासाहेबांना दुःख दिलं? मी जे योगदान दिले त्यावेळी उद्धव तु कुठे होतास? अशी टीका त्यावेळी राणेंनी केली. तसेच उद्धव ठाकरे देवळातल्या पुजाऱ्यासारखा दिसतो,जो पैसे आणून देईल तोच प्रिय अशा शब्दांतही राणेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

महाराष्ट्राला न्याय सन्मान मिळवून देण्यासाठी हा तुमचा पक्ष आहे.मला एकजूट द्या, मी तुमच्यासाठी आहे असं आवाहन त्यावेळी राणेंनी कोल्हापूरकरांना केलं. तसेच मला लोककल्याणकारी महाराष्ट्र् करायचा आहे. मला तुमचे आशीर्वाद हवे आहेत असंही त्यावेळी राणे म्हणाले.

दरम्यान माझा आणि कोल्हापुरकरांचा स्वभाव मिळताजुळता असल्यामुळेचे मी कोल्हापूरपासून माझ्या सभेची सुरुवात केली असल्याचं त्यावेळी नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS