नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जावई आणि काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांना सून मिळाली असल्याची जोरदार चर्चा सध्या सोशल मीडियावर पहायला मिळत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचं लग्न झालं नसलं तरी सोनिया गांधी यांना सून कशी मिळाली आणि पंतप्रधान मोदी यांना मुलगी नसली तरी त्यांना जावई कसा मिळाला याबाबत सध्या सोशल मीडियावर चर्चा पहायला मिळत आहे.
“मोदी जी आपका दामाद मिल गया है” @narendramodi @rakhisawant7 pic.twitter.com/RhSRLSxpIR
— Divya Spandana/Ramya (@divyaspandana) July 9, 2018
दरम्यान काँग्रेसच्या सोशल मीडिया आणि डिजिटल कम्युनिकेशन विंगच्या अध्यक्षा दिव्या स्पंदन यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे ही चर्चा रंगली आहे. ९ जुलै रोजी त्यांनी ट्विटरवर आयटम गर्ल राखी सावंतचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात राखी सावंत तिच्या नवीन बॉयफ्रेंडशी ओळख करुन देताना म्हणते की मोदीजी आपको दामाद मिल गया है, त्यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओनंतर नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं असल्याचं पहावयास मिळालं आहे.
“सोनिया जी आपकी बहु मिल गई है” @RahulGandhi pic.twitter.com/DDKhmrm9RY
— Tajinder Pal Singh Bagga (@TajinderBagga) July 9, 2018
दिव्या स्पंदन यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओनंतर त्यांना प्रत्युत्तर म्हणून भाजपनंही एक व्हिडीओ शअर केला आहे. ज्यामध्ये एक महिला राहुल गांधींसोबत लग्न करायचे असल्याचं म्हणत आहे. त्यामुळे या दोन्ही व्हिडीओची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
COMMENTS