उस्मानाबाद – साखरेचा गोडवा जिल्ह्यात शिवसेनेला बळ देईल ?

उस्मानाबाद – साखरेचा गोडवा जिल्ह्यात शिवसेनेला बळ देईल ?

उस्मानाबाद – जिल्ह्यात यंदाच्या गळीत हंगामात मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र आहे. त्यामुळे बंद पडलेले साखर कारखाने सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याशिवाय जिल्ह्यातील शिल्लक उसाचा प्रश्न सुटणारा नाही. शिवसेना उपनेते आमदार तानाजी सावंत यांनी परंडा,  भूम परिसरातील ऊसाचा प्रश्न सोडविण्यात काही अंशी तरी यश मिळविले आहे. सोनारी (ता. परंडा), तांदूळवाडी (ता. वाशी) येथील साखर कारखाने सुरू असल्याने येथील ऊसाचा प्रश्न बऱ्यापैकी सुटेल.

इंदापूर (ता. वाशी) येथील नरहसिंह साखर कारखाना गेली अनेक वर्षे बदं आहे. शिवसेनेचे दुसरे नेते शंकरराव बोरकर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आहेत. गेल्या चार वर्षांपासून हा कारखाना बंद आहे. आता पुन्हा एकदा बोरकर यांनी कारखान्यात रोलर पुजन केले आहे. त्यामुळे हा कारखाना सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे बोलले जात आहे. मागील हंगामात शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य दर न दिल्याने येथील शेतकरी नाराज होते. आता पुन्हा साखर कारखाना सुरू झाला तर शिल्लक ऊसाचा प्रश्न सोडविण्यास मदत होईल. यातून काहीतरी शेतकऱ्यांचा फायदा होईल काही प्रमाणात का होईना नाराजी दूर होऊ शकते. त्याचा फायदा पक्षाला आगामी निवणुकीत होऊ शकतो.

उस्मानाबादचे माजी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनीही बोरवंटी (ता. कळंब) येथील साखर कारखाना सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्याचे बोलले जात आहे. अर्थात उपनेते तानाजी सावंत यांच्याच मार्गदर्शनाखाली हा कारखाना सुरू होणार असल्याची चर्चा आहे. यंदा जिल्ह्यात उसाचे क्षेत्र वाढले आहे. त्यामुळे गाळपाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. शिवसनेच्या नेत्यांनी नियोजनाप्रमाणे हे कारखाने सुरू केले तर काही प्रमाणआत का होईना उसाच्या गाळपाचा प्रश्न सुटू शकतो. त्याचा राजकीय फायदा शिवसेनेला आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत किती होते ते पहावं लागेल.

COMMENTS